
पुणे: गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि यंदा पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट गणेशभक्तांना एका अनोख्या अनुभवाची भेट देण्यास सज्ज आहे. १३३ व्या वर्षाच्या गणेशोत्सवात, ट्रस्टने यंदा केरळमधील तिरुअनंतपुरम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्याचा निर्णय घेतला आहे. या थीमच्या शुभारंभ सोहळ्याने पुण्यातील गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.