

Pune Dahi Handi DJ Sound Hits 90 Decibels As Loud Music And Dhol Tasha Breach Prescribed Noise Pollution Limits
sakal
पुणे : गेल्या काही दिवसांपासून ध्वनिप्रदूषणाबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनानेही कडक निर्बंध लागू केले होते. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे यंदाच्या दहीहंडीच्या उत्सवात ‘डीजे’चा दणदणाट फारसा जाणवणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरल्याचे ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत समोर आले आहे. डीजेबरोबरच ढोल-ताशांनीही आपली आवाजाची मर्यादा ओलांडली होती.