

Four bass, four tops—but Pune suburbs still faced loud noise
esakal
पुणे : डीजेच्या दणदणाटाला पुणेकरांचा वाढता विरोध, पुणे पोलिसांनी घालून दिलेली ‘चार बेस, चार टॉप’ची मर्यादा आणि काही मंडळांनी स्वतःहून डीजेमुक्त दहीहंडी साजरी करण्याचा घेतलेला निर्णय यामुळे यंदा शहराच्या मध्यवर्ती भागात ध्वनिप्रदूषणाचा स्तर काहीसा नियंत्रणात राहिल्याचे चित्र दिसून आले. मात्र, उपनगरांसह शहराच्या काही भागांत ‘चार बेस, चार टॉप’ची संख्या मर्यादित असली, तरी ध्वनिवर्धकांचा आवाज कर्णकर्कश पातळीवर पोहोचल्याचे दिसून आले.