Pune Dam Water Level : पानशेत धरण ९१, तर वरसगाव ८२ टक्के भरले

धरण परिसरात पावसाचा जोर कमी असून घाटमाथ्यावर पाऊस पडला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात कमी प्रमाणात वाढ
pune dam water level Panshet Dam storage 91 percent Varasgaon 82 percent monsoon rain weather
pune dam water level Panshet Dam storage 91 percent Varasgaon 82 percent monsoon rain weatherSakal

खडकवासला : धरण परिसरात पावसाचा जोर कमी असून घाटमाथ्यावर पाऊस पडला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात कमी प्रमाणात वाढ होत आहे. दरम्यान पानशेत धरण ९१ तर, वरसगाव ८२ टक्के भरले आहे.

खडकवासला धरण भरल्यानंतर पानशेत व वरसगाव धरण परिसरात चांगला पाऊस पडला. कोकण घाटमाथ्यावर पावसात सातत्य राहिल्यास ही दोन्ही धरणे १५ ते २० दिवसांत पूर्ण भरतील. येत्या पंधरा दिवसांत होणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर पानशेत आणि वरसगाव धरणातून पाणी सोडण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी दिली.

पानशेत धरणात ९३ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाल्यावर जलविद्युत केंद्र (पावर हाऊस) आणि नदीमधून पाणी सोडण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

धरणाचे नाव - एकूण क्षमता - उपयुक्त पाणीसाठा - टक्केवारी (टीएमसी)

  • खडकवासला - १.९७ - १.८९ - ९५.५१

  • पानशेत- १०.६५ - ९.७१ - ९१.१६

  • वरसगाव - १२.८२ - १०.५२ - ८२.०५

  • टेमघर - ३.७१ - २.३५ - ६३.४४

  • चार धरणांतील एकूण क्षमता २९.१५ टीएमसी

  • आजचा एकूण उपयुक्त पाणीसाठा २४.४६ टीएमसी म्हणजे ८३.९२ टक्के

धरणाचे नाव - उपयुक्त पाणीसाठा - टक्केवारी - विसर्ग

  • मुळशी - २०.१६ - १७.३१ - ८५.८८ - १००० (सांडवा)

  • भामा आसखेड - ७.६७ - ६.०८ - ७९.२८ - ०

  • पवना - ८.५१ - ७.८८ - ९२.५६ - १४०० (पावर हाउस)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com