

Pune Dams
esakal
पुणे: वरुणराजाच्या दमदार कृपेने पुणे जिल्ह्याची पाण्याची चिंता अखेर मिटली आहे. जिल्ह्यातील सर्व छोटी, मोठी धरणे भरल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटले. एकीकडे पुणेकरांना वर्षभराचा दिलासा मिळाला, तर दुसरीकडे नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिल्याने धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.