भारतीय वनस्पतीशास्त्र सर्वेक्षण विभागात 'ओझोन' दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ozon day

भारतीय वनस्पतीशास्त्र सर्वेक्षण विभागात 'ओझोन' दिन साजरा

कोरेगाव पार्क: भारतीय वनस्पतीशास्त्र सर्वेक्षण (बी.एस.आय.) विभागाच्या वतीने गुरूवारी जागतिक ओझोन दिना निमित्त जागृती फेरी काढण्यात आली होती. यावेळी ‘ चांगल्या भविष्यासाठी, करा रक्षण ओझोनचे, वृक्षारोपन करा, तरच वाढेल ओझोनचे थर, केले प्रदुषण कमी तर वाढेल ओझनचे थर अशा घोषणा यावेळी देण्यात दिल्या.

हेही वाचा: इंदापूरच्या पश्‍चिम भागामध्ये लाळ्या खुरकूत रोगाचे थैमान

कोरेगाव पार्क येथील भारतीय वनस्पतीशास्त्र सर्वेक्षण विभागात जागतिक ओझोन दिना निमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनजागृती फेरी काढली होती. यावेळी डॉ. ऐ. बेन्नीयामिन म्हणाले, ‘‘ पृथ्वी पासून १६ ते ५० किलोमिटरच्या पट्ट्यात ओझनचा थर आढळतो. हा थर निर्माण होण्याची प्रक्रिया निरंतरपणे सुरू असते. या थरामुळे सुर्याच्या अतिनील किरणांपासून आपला बचाव होतो.

मात्र मानव निर्मित विविध उत्पादने व प्रदुषणामुळे क्लोरोफ्लोरा कार्बन, क्लोरिन आणि ब्रोमिन सारख्या वायुचा परिणाम ओझोनच्या थरावर होतो. त्यामुळे तापमान वाढत आहे. त्याचा परिणाम अंटार्टिकातील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळल्यामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. त्याचा धोका मानवाला होऊ शकतो. ’’

ओझोनचा थर कमी करण्यासाठी वाहनांचा प्रवास टाळावा. वाहनांमुळे होणारे वायुचे प्रदुषण ओझोनसाठी घातक आहे. रासायनिक किटकनाशकांचा वापर थांबवायला हवा. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करायला हवे. असे डॉ.ऐ.बेन्नीयामिन यांनी सांगितले.

टॅग्स :Pune News