Pune Crime News : पुण्यात संतापजनक घटना ! ९ वर्षांच्या मुलीची वडिलांकडून निर्घृणपणे हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी घर पेटवले

Father Kills Daughter : घटना ३ मे २०२६ रोजी पहाटे सुमारे ३:१५ वाजता घडली असून मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणात एका महिलेने माहिती लपवण्यास मदत केल्यामुळे पोलिसांनी दोघांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
Pune Crime News

Father Kills Daughter

esakal

Updated on

Pune Crime: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापुरची घटना ताजी असतानाच दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. पोटच्या ९ वर्षांच्या मुलीची वडिलांनीच लाकूड कापण्याच्या मशीनने गळा, डोके आणि गालावर वार करून क्रूर हत्या केली नाही. नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मुलीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून घर पेटवून दिले. या प्रकरणी दौंड पोलिसांनी वडिलांसह एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण दौंड तालुक्यात हळहळ आणि संतापाची लाट उसळली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com