

Pune Crime News Daytime Burglary in Kavdipat Thieves Steal Cash and Gold Silver Jewellery Worth Over 4 Lakh Rupees
esakal
लोणी काळभोर: घरांत कोणीही नाही याचा मोका साधून हवेली तालुक्यातील कदमवाकस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट परिसरात भरदिवसा धक्कादायक घरफोडीची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी बंद घरांचे कुलूप उचकटून आत प्रवेश करत, रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ४ लाख ८ हजार ४३६ रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.