esakal | पुणे: राज्यपालांच्या हस्ते ऑक्सिजन प्लांटचे शुक्रवारी लोकार्पण
sakal

बोलून बातमी शोधा

koshyari 123.jpg

पुणे: राज्यपालांच्या हस्ते ऑक्सिजन प्लांटचे शुक्रवारी लोकार्पण

sakal_logo
By
अनिल सावळे- सकाळ विशेष

पुणे: सेठ ताराचंद रामनाथ आयुर्वेदिक रुग्णालयासाठी ऑक्सिजन प्लांटचा लोकार्पण सोहळा येत्या शुक्रवारी (ता. १७) रोजी दुपारी ४.३० वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे. भारत विकास परिषदेच्या शिवाजीनगर- पुणे शाखेच्या वतीने हा प्लांट उभारण्यात आला असून, यासाठी सुमारे ४० लाख रुपये खर्च आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर-पुणे शाखेचे अध्यक्ष मंदार जोग यांनी दिली. हा लोकार्पण सोहळा कोरोना नियमांमुळे फक्त निमंत्रितांसाठी होणार आहे.

हेही वाचा: पुणे: औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंटची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध

कोरोना काळात ऑक्सिजनअभावी रुग्णांचे हाल होऊ नयेत, या हेतूने एकावेळी सुमारे शंभर रुग्णांना उपयोगी होईल असा हा प्लांट आहे. कोरोना काळात गेल्या दीड वर्षात भारत विकास परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये तीन रक्तदान शिबिरे, सुमारे दोन हजार डॉक्टरांसाठी फेसशिल्ड, दहा हजारांहून अधिक सॅनिटायझर बाटल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच, गरजूंसाठी सुमारे दोन हजार किराणा किट वाटप, समुपदेशनासाठी आरोग्यमित्र योजना राबविण्यात आली आहे.

भारत विकास परिषदेच्या वतीने येथे कायमस्वरुपी कृत्रिम पाय रोपण व्यवस्था सुरु असून, सुमारे २० हजार गरजूंनी याचा लाभ घेतला आहे. विकलांग मुक्त भारत हा संकल्प घेवून सेवा, समर्पण आणि सहयोग या त्रिसूत्रीच्या आधारे भारत विकास परिषदेचे काम देशभर सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

loading image
go to top