Mohan Joshi : कसबा निवडणुकीतील पराभवामुळेच घरपट्टी सवलत पुर्ववत

पुणेकरांना यापुर्वी सुरु असलेली घरपट्टी सवलत भाजप महापालिकेत सत्तेत आल्यानंतर त्यांनी विविध कारणे काढून ही सवलत काढून घेतली होती.
Mohan-Joshi
Mohan-Joshisakal
Summary

पुणेकरांना यापुर्वी सुरु असलेली घरपट्टी सवलत भाजप महापालिकेत सत्तेत आल्यानंतर त्यांनी विविध कारणे काढून ही सवलत काढून घेतली होती.

पुणे - पुणेकरांना यापुर्वी सुरु असलेली घरपट्टी सवलत भाजप महापालिकेत सत्तेत आल्यानंतर त्यांनी विविध कारणे काढून ही सवलत काढून घेतली होती. मात्र कसबा विधानसभा पोटनिवडणूकत फटका बसल्यामुळे भाजप जागा झाला असून त्यामुळे त्यांनी घरपट्टी सलवत पुर्ववत करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला.

राज्य सरकारने बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुणे महापालिकेच्या हद्दीत लागू असलेली 40 टक्के निवासी मिळकत करावरील सवलत पुर्ववत करण्याचा निर्णय घेतला. याबाबत जोशी यांनी भाजप सरकारवर टिका केली.

जोशी म्हणाले, 'महापालिका हि स्वायत्त संस्था आहे. त्यांनी विशेष ठराव करुन काही वर्षांपुर्वी हि सवलत लागू केली होती. मात्र भाजपने पैसे काढण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून 40 टक्के सवलत रद्द केली होती. नागरीकांनी विरोध दर्शविल्यानंतरही भाजपने दुर्लक्ष केले. मात्र कसबा विधानसभा निवडणुकीत त्यांना फटका बसला. त्यामुळे त्यांनी हि सवलत पुर्ववत केली.'

राज ठाकरेंमुळेच करसवलत - साईनाथ बाबर

मंत्रीमंडळाने निवासी मिळकतकरासाठीच्या 40 टक्के सवलत पुर्ववत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुणेकरांच्या डोक्‍यावरील भुर्दंड टळला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यापर्यंत लोकभावना पोचविल्या होत्या. त्यासाठी मनसेनेही अनेकदा आंदोलने करुन या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले होते. मनसेच्या प्रयत्नांमुळेच करसवलत पुर्ववत झाली असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com