

Digital Life Certificate Submission for Pensioners
Sakal
पुणे : संरक्षण मंत्रालयातर्फे देशभरातील स्पर्श पेन्शनधारकांसाठी ‘डिजिटल लाइफ सर्टिफिकेट’ (डीएलसी) मोहीम ४.० शनिवार(ता. १)पासून सुरू झाली आहे. ही मोहीम १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार असून, निवृत्तिवेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सुलभ आणि डिजिटल पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.