
पुणे : समाविष्ट ३२ गावांसाठी ग्रामपंचायतीच्या दराने दुप्पट मिळकत कर आकारण्यात यावा, हा मिळकत कर संबंधित गावांमधील नागरिकांकडून भरला जाईल, अशी मागणी समाविष्ट गावांच्या शुक्रवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत करण्यात आली. दरम्यान, महापालिकेने यासंदर्भात प्रश्न येत्या दोन महिन्यात सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे आश्वासन नागरिकांना दिले.