

Pune Road Width Reduction 50 Roads in Merged Villages Face Changes as PMC Revises Development Plan Amid Traffic Concerns
esakal
पुणे : पुणे महापालिकेत समाविष्ट गावांचा विकास आराखडा तयार करताना शहराच्या भविष्यातील गरजांकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र समोर आले आहे. वाढती लोकसंख्या, बांधकामे आणि वाहनांची संख्या लक्षात घेता समाविष्ट गावांमध्ये रस्त्यांचे जाळे सक्षम करणे अपेक्षित असताना, प्रारूप विकास आराखड्यात तब्बल ५० रस्त्यांची रुंदी कमी केली आहे. ३६ मीटर रुंदी असलेले रस्ते २४ मीटरपर्यंत कमी केले आहेत. तर वस्ती भागातील १२ मीटरचे रस्ते ९ मीटरपर्यंत कमी केले आहेतच, पण उंड्री येथील राज्य महामार्गाची रुंदीही ६० मीटरवरून थेट ४५ मीटरपर्यंत कमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समाविष्ट गावांमध्ये रोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असताना रस्त्यांची कमी केलेली रुंदी आत्मघातकी ठरण्याची शक्यता आहे.