
पुणे : कात्रज ते येरवडादरम्यान बोगदा प्रकल्पासाठी ‘प्रारूप व्यवहार्यता’ (प्री-फिजिबिलिटी) अहवाल तयार करण्याचे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सुरू करण्यात आले आहे. हा अहवाल तयार करताना पुणे शहरात येणाऱ्या कोणकोणत्या महामार्गांना बोगदा जोडता येईल, खासगी भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प राबविता येईल का, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे.