
कात्रज : कात्रज - कोंढवा रस्त्याच्या कामाला गती देण्यासाठी कडक भूमिका घेणार असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले. भूसंपादन करण्यासाठी किती जागा आवश्यक आहे आणि किती जागा ताब्यात आली आहे, याचा आढावा घेत कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे आयुक्तांनी आज (ता. २७) अधिकाऱ्यांसह रस्त्याच्या कामाची पाहणी केली.