
पुणे : झोपडपट्टीखालील जागा एसआरए प्राधिकरणाच्या ताब्यात देणाऱ्या मालकांना मोबदल्यापोटी टीडीआर देण्याच्या तरतुदीवरून राज्य शासनाच्या गृहनिर्माण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. झोपडपट्टी पुनर्वसनासाठी सुधारित नियमावलीच्या प्रारूपात अशा प्रकारे खासगी जमीनमालकांना मोबदला देण्याची तरतूद करण्यात आली नव्हती. परंतु हीच नियमावली अंतिम करताना त्यात परस्पर ही तरतूद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.