Wed, March 29, 2023

Pune : लोणीत महाशिवरात्रयात्रोत्सवाला सुरुवात दर्शनासाठी भाविकांची तुडूंब गर्दी
Published on : 18 February 2023, 11:24 am
पारगाव - आंबेगाव येथील ग्रामदैवत श्री. शंभो महादेव यात्रोत्सवाला आज शनिवारी महाशिवरात्रीपासुन उत्साहात सुरवात झाली. परिसरातील भाविकांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी लांबवर रांगा लावल्या होत्या.
मंदिरामध्ये आज दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी व अभिषेक करण्यासाठी गर्दि केली. होती.
परिसरातील ग्रामस्थांनी मांडवडहाळे व हारतुरेवाजत गाजत मिरवणुकीने आणुन देवास अर्पण केले. ग्रामस्थांच्या वतीने संपुर्ण दिवसभर भाविकांना केळी व खिचडीचे वाटप करण्यात आले सायंकाळी पालखीची मिरवणुक काढण्यात आली.