

FDA Issues Notice to Sadguru Shankar Maharaj Math Food Service in Dhankawadi
esakal
पुणे: धनकवडी येथील सद्गुरू शंकर महाराज मठातील अन्नछत्रासाठी अन्नपदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकाकडे अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार परवाना किंवा नोंदणी नसल्याचे समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी तेथे तपासणी केली असता ही बाब समोर आली आहे. तसेच अन्नपदार्थ अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत तयार केले जात असल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे त्रुटींची पूर्तता करून वैध अन्न परवाना किंवा नोंदणी प्राप्त करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.