धानोरीतील रखडलेल्या विकासकामांवरून आयुक्तांना जाब

धानोरीतील रखडलेल्या 
विकासकामांवरून आयुक्तांना जाब
Published on

विश्रांतवाडी, ता. ७ : पुणे महानगरपालिकेत समाविष्ट होऊन तीन दशके उलटली तरी धानोरी आणि पोरवाल रस्ता परिसरातील रस्ते, पाणी आणि सांडपाण्याची समस्या सुटलेली नाही. यावरून स्थायी समिती सदस्य सुहास टिंगरे यांनी आज साप्ताहिक बैठकीत आयुक्त नवलकिशोर राम आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
धानोरी, मुंजाबावस्ती, कलवड आणि खेसेपार्क परिसरातील नागरिक रोज वाहतूक कोंडी आणि पाणीटंचाईचा सामना करत आहेत. ३० वर्षांत एकही डीपी रस्ता पूर्ण विकसित न झाल्याबद्दल टिंगरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. विशेषतः फाइव्ह झिरो नाइन चौक ते जकात नाका या रस्त्याचे काम रखडल्याने त्यांनी प्रशासकीय दिरंगाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘धानोरीतून कोट्यवधींचा महसूल मिळतो, मग सुविधा का नाहीत?’ असा सवाल करत, जोपर्यंत रस्ते आणि पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. प्रशासनाने निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com