Pune News : धोबीघाट येथे प्रदूषण विरहित गॅस दाहिणी बसविणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gas Funeral

सामाजिक बंधिलकी जपत लायन्स क्लब ऑफ पुणे (बिबवेवाडी) यांनी कॅंटॉन्मेंटच्या धोबीघाट मुक्तिधाम येथे सीएनजी दाहिनी बसवून देण्याचा निर्णय हाती घेतला आहे.

Pune News : धोबीघाट येथे प्रदूषण विरहित गॅस दाहिणी बसविणार

कॅन्टोमेंन्ट - सामाजिक बंधिलकी जपत लायन्स क्लब ऑफ पुणे (बिबवेवाडी) यांनी कॅंटॉन्मेंटच्या धोबीघाट मुक्तिधाम येथे सीएनजी दाहिनी बसवून देण्याचा निर्णय हाती घेतला आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारसाठी निर्माण होणाऱ्या अडचणीच्या समस्या सुटणार असल्याने या कार्याप्रती लोकांनी क्लबचे आभार मानले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कॅंटॉन्मेंटची धोबीघाट मुक्तिधाम येथील विद्युत दाहिणीची चिमणी कोसळल्याने ती बंद झाली होती.

बोर्डालाही आर्थिक चणचण भासल्याने दाहिणीचे काम करणे शक्य होत नव्हते. सामाजिक दायित्व निधीसाठी (सीएसआर) बोर्ड प्रशासनाकडून प्रयत्न केले जात होते. अशा प्रसंगी या क्लबने स्वतःहून पुढाकार घेऊन विद्युत दाहीणी ऐवजी गॅस दाहिणी बसवून देण्याची तयारी दर्शविली आहे. याकरिता एक कोटी रुपये खर्चून दोन सीएनजी दाहिन्या बसविल्या जात असल्याचे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल यांनी सांगितले.

यासंदर्भात पुणे कॅंटॉन्मेंट बोर्डात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन मथुरावाला, लायन्स क्लबचे सेक्रेटरी गोविंद चव्हाण, जनसंपर्क अधिकारी महेंद्र ओसवाल, विपुल बागडेचा, गौतम जैन, मिरल पटेल आदि पदाधिकारी होते.

पुणे कॅन्टोमेंट बोर्डाची धोबीघाट येथे एकमेव मुक्तिधाम ही विधुत दाहिनी असून, ती बारा वर्षापूर्वी सुरू करण्यात आली होती. ती 2016 मध्ये बदलणे अपेक्षित होते. दरम्यान, कोरोना काळात दाहिनीवर अधिक भार पडत होता. दररोज 30 ते 35 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. एप्रिल महिन्यात दाहिनीची चिमणी कोसळली तेव्हांपासून ही दाहिनी बंद होती. परिणामी अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर केला जात आहे. त्याच बरोबर पर्याय म्हणून वैकुंठ याठिकाणी लोकांना 7 ते 8 सिग्नल पार करून जावे लागतात. त्यात वाहतुकीची समस्या ही मोठी असल्याने लोकांचा वेळही अधिक जात असतो.

या सर्व नागरिकांच्या समस्या दररोज डोळ्यासमोर उभ्या होत्या. या कारणे आपण ही समाजाचे काही तरी देण लागतो या भावनेतून प्रत्येक वेळी सरकारकडून अपेक्षा न करता स्वतःहूनच क्लबने पुढाकार घेतला. तसेच पुढील वर्षी 15 जानेवारी पर्यंत ही दाहिनी सुरू होणार आहे. विशेष म्हणजे ही दाहिणी प्रदूषण विरहित असून 10 ते 15 मिनिटात अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपला जाईल. त्याचबरोबर परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय, बसण्याची आसने रंगरंगोटी व नूतनीकरण करत आदि सोयीसुविधा उपलब्ध करून अद्ययावत दाहिणी करणार असल्याचे लायन्स क्लबचे महेंद्र ओसवाल यांनी सांगितले.

टॅग्स :punepollution