

The Central Bureau of Narcotics busted a high-tech Pune MD Drug Lab operating in the Dighi-Bhosari area during Operation Vajra.
पुणे : पुण्यातील दिघी-भोसरी परिसरात अत्याधुनिक मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ निर्मिती करणारी प्रयोगशाळा सुरू असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मध्य प्रदेश केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (सीबीएन) 'ऑपरेशन वज्र' मोहीम राबवत राजस्थानातील जोधपूर आणि मध्य प्रदेशातील उज्जैन येथून अमली पदार्थ तस्करी रॅकेट चालविणाऱ्या दोन प्रमुख आरोपींना अटक केली आहे.