
Pune Disabled Students Protest: राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने वसतीगृहांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेले आरक्षण रद्द करून त्याजागी समांतर आरक्षण लागू केल्याच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयामुळे शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेशाच्या दृष्टीने दिव्यांग विद्यार्थ्यांचे हक्क डावलले जात असल्याचा आरोप करत पुण्यात सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली.