पुणे : निकृष्ट बेबी केअर कीट व खेळणी साहित्याचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

baby

पुणे : निकृष्ट बेबी केअर कीट व खेळणी साहित्याचे वाटप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात आलेल्या निकृष्ट बेबी केअर कीट व खेळणी साहित्याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी एकात्मिक बालविकास आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यात निकृष्ट बेबी केअर कीट व खेळणी साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये ११ हजार हजार १०६ बेबी केअर कीट तर, ६ हजार हजार ३६ खेळणी पुरवठा करण्यात आला आहे. या दोन्ही वस्तूंचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून त्याची तपासणी करावी, असे शिवतरे यांनी अग्रवाल पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा: हस्ताक्षरावरून पटली ओळख? गडचिरोलीच्या चकमकीत 'ते' चौघे ठार?

पुरवठा करण्यात आलेल्या बेबी केअर किटमध्ये मुलांचे कपडे, लहान मुलांसाठी झोपण्याची गादी, हातमोजे, पायमोजे, टॉवेल, तापमान यंत्र व कीट बॅग हे अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. सलग दोन वर्षे हा पुरवठा निकृष्ट दर्जाचा झाल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. सन २०२०-२१ वर्षात बेबी केअरच्या ११ हजार १०६ तर, सन २०२१-२२ या वर्षात १९ हजार ९८९ बेबी केअर कीटचा पुरवठा झालेला आहे. बेबी केअर कीट व खेळणी साहित्याचा कोणत्याही प्रकारचा नमुना जिल्हा परिषदेमध्ये ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे शासनाने नेमक्या कोणत्या दर्जाच्या साहित्याची खरेदी केली आहे, याची माहिती अधिकाऱ्यांना नाही. राज्य सरकारने मान्यता दिलेल्या या पुरवठादाराने राज्यात ७९ कोटी रुपयांच्या कीट वाटप केल्या असल्याचे यात नमूद केले आहे.

loading image
go to top