कोरोनाग्रस्तांची संख्या घटतेय; शुक्रवारी आढळले २ हजाराहून कमी रुग्ण!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये 490, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 596, नगरपालिका क्षेत्रात 140 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 54 नवे रुग्ण सापडले आहेत.

पुणे : जिल्ह्यात शुक्रवारी (ता.9) दिवसभरात 1 हजार 957 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 697 जण आहेत. यामुळे जिल्ह्यातील आजअखेरपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता 3 लाख 3 हजार 349 झाली आहे. शुक्रवारी 2 हजार 87 जण कोरोनामुक्त झाले असून 46 जणांचा मृत्यू झाला आहे.

मारटकर खून प्रकरण : वेश्‍यावस्तीत वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठीच खून​

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये 490, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 596, नगरपालिका क्षेत्रात 140 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 54 नवे रुग्ण सापडले आहेत. शुक्रवारी दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील सर्वाधिक 23 जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील 7, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 12, नगरपालिका क्षेत्रातील 3 आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही गुरुवार (ता.8) रात्री 9 वाजल्यापासून शुक्रवारी (ता.9) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

साडेसहा महिने झाले ओ, मुलीचं तोंड पाहिलं नाही; बायको अन् तिच्या घरचे भेटू देईना!​

दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील 7 हजार 28 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला
आहे. एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 3 हजार 934, पिंपरी-
चिंचवडमधील 1 हजार 412, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 1 हजार 139,
नगरपालिका क्षेत्रातील 409 आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 180 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 300 जण आहेत. आतापर्यंत 12 लाख 65 हजार 557 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. एकूण चाचण्यांपैकी शुक्रवारी दिवसभरात 11 हजार 184 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune district 1957 new corona patients found on Friday 9th October 2020