पुणे : हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या वाढली; दिवसभरात अडीच हजाराहून अधिक रुग्णांची पडली भर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 August 2020

गेल्या २४ तासांत २ हजार ४०६ जण कोरोनामुक्त झाले असून अन्य ६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात रविवारी दिवसभरात (ता.२३) २ हजार ५८० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार २२५ जण आहेत. दरम्यान, उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. 

सध्या १९ हजार १२३ रुग्ण विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय १२ हजार २०१ कोरोना रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत.

पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार २२५ रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवड शहरातील ७५०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ४०९, नगरपालिका क्षेत्रातील १४९ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील ४७ रुग्णांचा समावेश आहे.

मोठी बातमी : कोविडची लस ७३ दिवसांत येणार नाही; वाचा सीरम इन्स्टिट्यूटचा खुलासा 

दरम्यान, गेल्या २४ तासांत २ हजार ४०६ जण कोरोनामुक्त झाले असून अन्य ६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या एकूण मृत्यूपैकी पुणे शहरातील सर्वाधिक ३८ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ६, जिल्हा परिषद क्षेत्रातील १३, नगरपालिका क्षेत्रातील ३ आणि  कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही शनिवारी (ता.२२) रात्री ९ वाजल्यापासून रविवारी (ता.२३) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

यामुळे जिल्ह्यातील रविवार अखेरपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख ४५ हजार ४१, कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या १ लाख १० हजार २९१, तर रुग्णांच्या मृत्यूची संख्या ३ हजार ५५६ झाली आहे. मृत्यू  झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ९३ रुग्णांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune district 2580 new corona patients found on Sunday 23rd August