पुण्यात नोंदवला गेला मृत्यूंचा उच्चांक; दिवसभरात झाला 'इतक्या' कोरोनाग्रस्तांचा मृत्यू!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 August 2020

कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही शुक्रवारी (ता.७) रात्री ९ वाजल्यापासून शनिवारी (ता.८) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता.८) २ हजार ६३९ नवे कोरोना सापडले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार २९० जणांचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी ७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंच्या आकड्याचा आजपर्यंतचा उच्चांक नोंदला गेला आहे. 

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये ९८७, जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात २२०, नगरपालिका क्षेत्रात ६० आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ८२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

काय म्हणावं या चोरांना; घरफाेडीच्या पैशातून विकत घेतलं घर, कार अन् दागिने​

दरम्यान, शनिवारी दिवसभरात ७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही शुक्रवारी (ता.७) रात्री ९ वाजल्यापासून शनिवारी (ता.८) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे. शनिवारी मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ३७ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील १९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १० आणि नगरपालिका व कॅंंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात मिळून चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १ लाख पाच हजार ५२३ झाली आहे. यापैकी ७६ हजार ७२६ उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत २ हजार ४१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत २६ हजार ६५५ उपचार घेत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune district 2639 new corona patients found on 8th August 2020