पुण्यात कोरोनाचा कहर सुरूच; चौथ्यांदा रुग्णांचा आकडा ३ हजार पार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

शुक्रवारी जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ८४ हजार ७६५ झाली आहे. याशिवाय आतापर्यंत १ हजार ९८१ मृत्यू झाले आहेत.

पुणे : पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात मिळून जिल्ह्यात शुक्रवारी (ता.३१) दिवसभरात तीन हजार ९४ नवे रुग्ण सापडले आहेत. एकाच दिवसात नव्या रुग्णांचा तब्बल तीन हजारांचा आकडा ओलांडण्याची ही चौथी वेळ आहे.

याआधी २२ जुलैला तीन हजार २१८, त्यानंतर २८ जुलैला तीन हजार ४४ तर, ३० जुलैला ३ हजार ६५८ नवे रुग्ण सापडले होते. शुक्रवारी पुन्हा तीन हजार ९४ रुग्ण आढळून आले आहेत. 

पुण्यात शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊनबाबत प्रशासनाने दिले स्पष्टीकरण; वाचा सविस्तर​

शुक्रवारी दिवसभरातील एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील एक हजार ८८०, पिंपरी चिंचवडमधील ८८३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २३२ आणि नगरपालिका व कॅंंटोन्मेंट बोर्डातील मिळून ९९ रुग्णांचा समावेश आहे. गुरुवारी (ता. ३०) रात्री ९ वाजल्यापासून शुक्रवारी (ता.३१) रात्री नऊ वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे.

यामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ८४ हजार ७६५ झाली आहे. याशिवाय आतापर्यंत १ हजार ९८१ मृत्यू झाले आहेत.

दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक २८ जण आहेत. याशिवाय पिंपरी चिंचवडमधील १२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १४ आणि नगरपालिका व कॅंंटोन्मेंट बोर्डातील मिळून ५ जणांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune district 3094 new corona patients found in one day