पुणे जिल्ह्यात ९० लाख नागरिक लसवंत

आतापर्यंत १ कोटी ५७ लाख कोरोना डोस पूर्ण
Corona Booster Dose News
Corona Booster Dose Newssakal

पुणे पुणे जिल्ह्यातील ८९ लाख २७ हजार ८७ जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ९० लाख नागरिक लसवंत झाले आहेत. पहिला डोस घेतलेल्यांपैकी ६७ लाख ९१ हजार ७७३ जणांचा दुसरा डोसही पूर्ण झाला आहे. त्यामुळे पहिला आणि दुसरा डोस मिळून एकूण १ कोटी ५७ लाख १८ हजार ८६० कोरोना डोस पूर्ण झाले आहेत.

Corona Booster Dose News
'लहानग्यांना आमचीच लस द्या, कारण...'; भारत बायोटेकचं आरोग्य कर्मचाऱ्यांना आवाहन

राज्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना लसीकरण सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्सना ही लस देण्यात आली. लसीकरणाचा दुसरा टप्पा १६ मार्च २०२१ पासून सुरु झाला. या टप्प्यात ५० वर्षे वयापुढील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांपुढील सहव्याधी असलेले नागरिकांना ही लस देण्यास सुरवात झाली. तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांपुढील सर्वांना तर, चौथ्या टप्प्यात १८ वर्षांपुढील सर्वांना ही लस देण्यास सुरवात झाली. मागील सुमारे तेरा महिन्यांपासून शहर व जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरु आहे.

संवर्ग, वयोगटनिहाय पहिला डोस झालेले नागरिक

  • आरोग्य कर्मचारी, १ लाख ६२ हजार ५९०

  • फ्रंट लाईन वर्कर्स, २ लाख ६९ हजार ३२६

  • ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांपुढील), १२ लाख ८० हजार १५२

  • ४५ वर्षे वयापुढील नागरिक, १७ लाख ६२ हजार २२४

  • १८ ते ४४ वयोगटातील नागरिक, ५४ लाख ५२ हजार ७९५

  • एकूण, ८९ लाख २७ हजार ०८७

Corona Booster Dose News
गोव्यात महाविकास आघाडी नाहीच! राष्ट्रवादी-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब

दोन डोस पूर्ण झालेले नागरिक

  • आरोग्य कर्मचारी, १ लाख ४३ हजार ८९८

  • फ्रंट लाईन वर्कर्स, २ लाख ३९ हजार ३४९

  • ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांपुढील), १० लाख ५८ हजार ४७७

  • ४५ वर्षे वयापुढील नागरिक, १४ लाख ०९ हजार ३५२

  • १८ ते ४४ वयोगटातील नागरिक, ३९ लाख ४० हजार ६९७

  • एकूण, ६७ लाख ९१ हजार ७७३

पहिल्या आणि दुसऱ्या डोसची एकत्रित संख्या

  • पुणे शहर, ६२ लाख १६ हजार ४१४

  • पिंपरी चिंचवड, ३० लाख ९८ हजार ८५९

  • पुणे ग्रामीण, ६४ लाख ०३ हजार ५८७

  • एकूण, १ कोटी ५७ लाख १८ हजार ८६०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com