PDCC Bank
PDCC Banksakal

पुणे जिल्हा बॅंक निवडणूक : निवडणुकीच्या रिंगणातून ७५ जणांची माघार

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणातून आतापर्यंत ७५ जणांनी माघार घेतली आहे.
Published on

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (PDCC) पंचवार्षिक निवडणुकीच्या (Election) रिंगणातून आतापर्यंत ७५ जणांनी माघार घेतली आहे. मागील तेरा दिवसांपासून अर्ज माघारीसाठी मुदत देण्यात आलेली आहे. येत्या बुधवारी (ता.२२) उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. सध्या या बॅंकेच्या (Bank) निवडणूक रिंगणात ८४ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. माघार घेऊ इच्छिणाऱ्यांना बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे.

येत्या गुरुवारी (ता.२३) सकाळी अकरा वाजता निवडणूक रिंगणात उरलेल्या सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. चिन्ह वाटपानंतर लगेच उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सहकार विभागातून सांगण्यात आले. या निवडणुकीसाठी येत्या २ जानेवारीला सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार आहे. त्यानंतर ४ जानेवारी २०२२ ला मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे.

PDCC Bank
बेळगाव : धर्मांतरविरोधी विधेयकावरून कॉंग्रेसचा सभात्याग

जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे. यापैकी आतापर्यंत सात जागा बिनविरोध झाल्या असून, त्याबाबतची केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे. बिनविरोध झालेल्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप आदींचा समावेश आहे.

आतापर्यंत माघार घेतलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्‍वास देवकाते, सतीश खोमणे, सविता दगडे, माजी सभापती भाऊसाहेब करे, संभाजी होळकर, पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे, सतीश काकडे, निवृत्ती गवारे, वैशाली गोपाळघरे, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, शरद बुट्टे पाटील, स्वाती पाचुंदकर आदींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com