esakal | Pune : जिल्हा बॅंकेकडून सर्वसामान्यांना आधार
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : जिल्हा बॅंकेकडून सर्वसामान्यांना आधार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना आधार देणारी बॅंक आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले. शेतकऱ्यांनी बँकेच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

लासुर्णे (ता. इंदापूर) येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या एटीएम उद्घाटनप्रसंगी भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, सचिन सपकाळ, अॅड. तेजसिंह पाटील, डॉ. योगेश पाटील, सरपंच सागर पाटील, बाळासाहेब सपकळ, सोमनाथ निंबाळकर, राजेश खरात, विभागीय अधिकारी आनंद थोरात, लासुर्णे शाखा व्यवस्थापक बाळासाहेब थोरात, विकास अधिकारी सुदाम खरात उपस्थित होते.

यावेळी भरणे यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्यातील २२ गावांसह शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मिटविणार आहे. शेतकऱ्यांना कधीच पाणी कमी पडणार नाही, असे नियोजन केले जाईल. महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरविणार असून यासाठी गावोगावी पिण्याच्या पाणी योजना राबविण्याचे काम सुरु आहे. लासुर्णे परीसरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाणी योजनेसाठी ९ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. तसेच लहीरोबानगर -कर्दनवाडी- मोहितेवाडी- मानकरावाडी मार्गे उद्घटला जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी सुमारे ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर होणार आहे.

loading image
go to top