पुणे जिल्हा बॅंकेतर्फे खरिपासाठी यंदा दीड हजार कोटींचे पीककर्ज

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (पीडीसीसी) चालू वर्षीच्या खरीप हंगामात गेल्या अडीच महिन्यात १ हजार ४४८ कोटी १५ लाख ८१ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले.
pune district bank
pune district bankSakal
Summary

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (पीडीसीसी) चालू वर्षीच्या खरीप हंगामात गेल्या अडीच महिन्यात १ हजार ४४८ कोटी १५ लाख ८१ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले.

पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (पीडीसीसी) चालू वर्षीच्या खरीप हंगामात गेल्या अडीच महिन्यात १ हजार ४४८ कोटी १५ लाख ८१ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील कर्ज वाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ८०.३८ टक्के इतके पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षीच्या खरिपातील आजअखेरपर्यंतच्या कर्ज वाटपाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत ११८ कोटी ६८ लाख ८७ हजार रुपयांचे अधिकचे पीक कर्ज वाटप झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ८४ हजार ९९४ शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ मिळाला आहे. दरम्यान, खरीप हंगामातील पिकांसाठी येत्या ३० सप्टेंबरपर्यंत कर्ज वाटप चालू राहणार आहे.

हे सर्व पीककर्ज शून्य टक्के व्याजाचे असून, एवढ्या मोठ्या रक्कमेचे पीक कर्ज वाटप शून्य टक्के व्याजाने करणारी पुणे ही राज्यातील एकमेव जिल्हा बॅक ठरली आहे. मागील पंधरा वर्षापासून पुणे जिल्हा बॅंकेच्यावतीने शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने वितरित केले जात आहे. त्यानंतर सातारा जिल्हा बॅंकेनेही पुणे जिल्हा बॅंकेच्या पावलावर पाऊल ठेवत, हाच उपक्रम मागील दहा वर्षांपासून सुरु केला आहे. पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यात शून्य टक्के व्याजाचा हा प्रयोग यशस्वी झाल्याचे पाहून, राज्य सरकारने मागील दोन दोन वर्षांपासून राज्यभर कर्ज वाटपाचा हा ‘पॅटर्न’ सुरू केला आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांसाठी जिल्हा बॅंकेने १ हजार ८०० कोटी १ लाख ६५ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट येत्या ३० सप्टेंबरपर्यंतचे आहे. मात्र यापैकी ८०.३८ टक्के उद्दिष्ट हे १ एप्रिल २०२२ ते ११ जून २०२२ या पहिल्या सुमारे अडीच महिन्यांच्या कालावधीतच पूर्ण झाले असल्याचे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज दृष्टीक्षेपात...

  • खरिपासाठी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट --- १ हजार ८०० कोटी १ लाख ६५ हजार रुपये

  • आतापर्यंत प्रत्यक्षात पूर्ण झालेले वाटप --- १ हजार ४४८ कोटी १५ लाख ८१ हजार रुपये

  • पीक कर्जाचा लाभ घेतलेले एकूण शेतकरी --- १ लाख ८४ हजार ७८८

  • पीक कर्जाचा लाभ झालेले क्षेत्र --- १ लाख ५९ हजार ४४९ हेक्टर

  • गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील आजअखेरचे वाटप --- १ हजार ३२९ कोटी ४६ लाख ९४ हजार रुपये

  • गेल्यावर्षी तुलनेत यंदा वाटपात झालेली वाढ --- ११८ कोटी ६८ लाख ८७ हजार रुपये

आतापर्यंतचे तालुकानिहाय कर्ज वाटप (रुपयांत)

  • आंबेगाव --- ११४ कोटी ४१ लाख १८ हजार

  • बारामती --- १६९ कोटी ९८ लाख ६० हजार

  • भोर --- ७२ कोटी ३२ लाख २१ हजार

  • दौंड --- १७९ कोटी ४८ लाख ९१ हजार

  • हवेली --- ५२ कोटी १९ लाख ११ हजार

  • इंदापूर --- १०२ कोटी ९६ लाख ५८ हजार

  • जुन्नर --- १८४ कोटी १६ लाख २५ हजार

  • खेड --- १५० कोटी १४ लाख ८७ हजार

  • मावळ --- ३५ कोटी ९४ लाख ८० हजार

  • मुळशी --- २३ कोटी पाच लाख ९० हजार

  • पुरंदर --- १३८ कोटी २३ लाख ८८ हजार

  • शिरूर --- २१३ कोटी ७३ लाख ३७ हजार

  • वेल्हे --- ११ कोटी ५० लाख १५ हजार

  • जिल्हा एकूण --- १४४८ कोटी १५ लाख ८१ हजार

पुणे जिल्हा बॅंकेच्यावतीने यंदाच्या खरीप व रब्बी हंगामात मिळून एकूण दोन हजार ४०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी खरिपासाठीचे उद्दिष्ट हे १ हजार ८०० कोटी १ लाख ६५ हजार रुपयांचे आहे. या पीक कर्ज वाटप उपक्रमांतर्गत मागेल त्या पात्र शेतकऱ्याला लाभ दिला जात आहे. कर्जाची मागणी केलेला एकही पात्र शेतकरी पीक कर्जाच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी जिल्हा बॅक सातत्याने घेत आहे.

- प्रा. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com