मोठी बातमी : अत्यावश्यक सेवा-उद्योग सुरू होणार; परवानग्यांसाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

MIDC
MIDC

पुणे : लॉकडाऊनच्या अनुषंगाने औद्योगिक क्षेत्राकरीता आवश्यक परवानग्या देण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

समन्वय अधिकारी, जबाबदारी आणि संपर्क क्रमांक : 
सदाशिव सुरवसे (9923911196) सहसंचालक (उद्योग हे औद्योगिक क्षेत्रातील मार्गदर्शक सूचनाप्रमाणे अत्यावश्यक सेवेचे उद्योग सुरु ठेवण्यासाठी समन्वयक म्हणून काम पाहतील. तसेच एमआयडीसीचे उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल (7028425256) यांच्याकडे महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील अत्यावश्यक सेवाकरीता संबंधित उद्योगांना परवानग्या देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

क्षेत्र व्यवस्थापक काळे (8975003969) यांच्याकडे पिंपरी-चिंचवड, भोसरी आणि आकुर्डी, क्षेत्र व्यवस्थापक भिडे यांच्याकडे (8275378459) बारामती व पणदरे, क्षेत्र व्यवस्थापक हसरमनी (9822973006) यांच्याकडे चाकण-1,2,3 व 4, क्षेत्र व्यवस्थापक घाटे (9975148872) यांच्याकडे रांजनगाव व तळेगाव या भागाची सोपविण्यात आली आहे.

एमआयडीसीचे उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख (9594612444) यांच्याकडे महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील अत्यावश्यक सेवाकरीता संबंधित उद्योगांना परवानग्या देणे. क्षेत्र व्यवस्थापक जाधव (9850561338) यांच्याकडे जेजुरी, कुरकंभ, इंदापूर, भिगवण व पाटस तसेच क्षेत्र व्यवस्थापक रासणे (8108908296) यांच्याकडे तळवडे, खराडी, हिंजवडी व खेड सेज या भागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जिल्हा उद्योग समितीचे व्यवस्थापक रेंधाळकर (9822285518), निरीक्षक उद्योग यशवंत गायकवाड (9404676667) आणि निरीक्षक उद्योग मनिषा गायकवाड (9923199633) यांच्याकडे वरील क्षेत्राव्यतिरिक्त इतर सर्व क्षेत्राकरीता सर्व अत्यावश्यक उद्योगांसाठी परवानगी देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कोरोनाची परिस्थिती पाहूनच याबाबतचे निर्णय संबंधित अधिकारी घेणार आहेत. टप्प्याटप्प्याने उद्योग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com