Pune District Collector Fraud : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला तोतयाने घातला २० लाखांचा गंडा, सत्य समोर येताच उडाली खळबळ; नेमकं काय घडलं?

Fake Letterhead Scam: या बनावट कागदपत्रांच्या आधारे लोणावळ्यातील शासकीय विश्रामगृहाचा अनधिकृत वापर केल्याचा आरोप आहे. तसेच पुणे ग्रामीण पोलिसांचे एस्कॉर्टिंग आणि इतर सरकारी सुविधांचा गैरफायदा घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.
Government Facility Fraud

Government Facility Fraud

esakal

Updated on

पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.पुणे जिल्ह्याधिकाऱ्याला एका तोतयाने चक्क २० लाखांचा गंडा घातल्याने प्रशासनाच्या कामाकाजावर प्रश्नचिह्न निर्माण झाले आहे. एका व्यक्तीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या महाराष्ट्र व गोवा राज्याचा प्रतिनिधी असल्याचे भासवून बनावट लेटर हेड तयार करून त्याद्वारे गंडा घालण्यात आला आहे.धर्मेंद्र ब्रिजलाल सोनकर (रा. पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com