esakal | पुणे जिल्ह्यात 'हे' आहेत 'कंटेनमेंट झोन'; या यादीत तुमचं गाव तर नाही ना?
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Restricted-Area

जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये उपविभागीय अधिकारी हे घटना व्यवस्थापक (इन्सिडेंट कमांडर) म्हणून काम करतील.

पुणे जिल्ह्यात 'हे' आहेत 'कंटेनमेंट झोन'; या यादीत तुमचं गाव तर नाही ना?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेर जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबतचे आदेश सोमवारी (ता.४) रात्री जारी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सात तालुक्यांमध्ये कोरोना बाधित आणि संशयित व्यक्तींची वाढती संख्या विचारात घेऊन प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) जाहीर करण्यात आले आहेत. 

तालुके आणि त्यातील प्रतिबंधित गावे : 

बारामती : माळेगाव बुद्रुक आणि लकडे नगर 

इंदापूर : भिगवण, तक्रारवाडी आणि डिक्सळ

हवेली : जांभुळवाडी, वाघोली, आव्हाळवाडी, भावडी, केसनंद, नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, सोनापूर, मालखेड, वरदाडे, जांभुळवाडी, कोळेवाडी गावचा रहिवासी परिसर, किरकटवाडी (कोल्हेवाडी), नरहे, खानापूर, लोणीकंद, उरळी कांचन, पिसोळी, वडाचीवाडी, हांडेवाडी, सिद्धिविनायक नगरी, दत्तनगर, परमार कॉम्प्लेक्स, मांजरी बुद्रुक, कदम वस्ती, लोणी काळभोर, कोंढवे-धावडे.

- नोकरभरती आणि बदल्यांबाबत राज्य सरकारने घेतला आजवरचा सर्वात मोठा निर्णय; वाचा सविस्तर!

शिरूर : शिक्रापूर 

वेल्हा : निगडे मोसे, ओसाडे, वेल्हे बुद्रुक, कोंढवाळे बुद्रुक कोंढवाळे खुर्द, खोडद, ढाणे, वाघदरा, ब्राह्मणघर, हिरपोडी.

भोर : नसरापूर, कामथडी, खडकी, उंबरे, नायगाव, मालेगाव, देगाव, दिडघर, सांगवी बुद्रुक, निधान, वीरवाडी, केतकवळे.

दौंड :  दहिटणे, मिरवाडी, नांदूर, खामगाव, गणेशनगर देवकर मळा, बैलखिळा, दुबेवाडी, दौंड शहर व बिगर नगरपालिका क्षेत्र गोपाळवाडी, माळवाडी, मसनरवाडी लिंगाळी, पवार वस्ती, दळवी मळा, भवानी मळा, भोंगळे मळा.

 #Lockdown3.0 : घसा ओला करण्यासाठी तळीराम रस्त्यावर; दारुच्या दुकानांबाहेर लाबंच लांब रांगा

प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये या बाबींवर निर्बंध: 
- सायकल रिक्षा, ऑटो रिक्षा, टॅक्सी, कॅब सेवा ,बस सेवा, सलून, स्पा दुकाने.
- दुचाकी वाहनावर मागच्या सीटवर व्यक्तीला बसता येणार नाही 
- चारचाकी वाहनांमध्ये वाहन चालका व्यतिरिक्त दोन प्रवाशांना परवानगी
- औद्योगिक वसाहतीमधील औषधी कंपन्या, वैद्यकीय उपकरणे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जाणारे हार्डवेअर उत्पादन, पॅकेजिंग मटेरिअलच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट, ग्रामीण भागातील सर्व औद्योगिक उपक्रमांना परवानगी असेल.

- महत्त्वाची बातमी : लॉकडाउनमध्येही पुणेकरांना दररोज मिळणार वृत्तपत्र!

-  ग्रामीण भागात सर्व बांधकामांना परवानगी 
- ग्रामीण भागात मॉल वगळता सर्व दुकानांना परवानगी.
जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये उपविभागीय अधिकारी हे घटना व्यवस्थापक (इन्सिडेंट कमांडर) म्हणून काम करतील.

- कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा