Dilip Walse Patilsakal
पुणे
Dilip Walse Patil : पुणे जिल्हा सहकारी बँकेत एक हजार जागा व शरद बँकेत 67 जागांची होणार भरती
शरद बँकेची प्रगतीकडे दमदार वाटचाल; चार हजार कोटी रुपयांच्या पुढे वार्षिक उलाढाल होईल.
मंचर - 'शरद सहकारी बँकेची स्थापना सहकार महर्षी माजी आमदार (स्व.) दत्तात्रय वळसे पाटील, (स्व.) प्रकाश शहा यांच्यासह जुन्या पिढीतील मान्यवरांनी ५१ वर्षांपूर्वी केली. अनेक अडचणींवर बँकेने मात केली आहे. बँकेची आर्थिक परस्थिती उत्तम आहे. बँकेच्या सध्या २७ शाखा असून लवकरच ५० शाखांचा टप्पा पूर्ण करेल. चार हजार कोटी रुपयांच्या पुढे वार्षिक उलाढाल होईल.' असा विश्वास राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.