
पुणे जिल्ह्यात बुधवारी ३४४ नवे कोरोना रुग्ण; पाच जणांचा मृत्यू
पुणे : पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.२३) दिवसभरात ३४४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट ७०० जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात अन्य पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहर व जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी दोन आणि पिंपरी चिंचवडमधील एक मृत्यू आहे. (Pune District Corona Updates)
दरम्यान, पुणे शहरातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारच्या (ता.२२) बुधवारी (ता.२३) १७४ ने कमी झाली आहे. यामुळे शहरात सध्या १७७३ सक्रिय कोरोना रुग्ण शिल्लक राहिले आहेत. मंगळवारी हीच संख्या १९४७ इतकी होती. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने रोज रात्री शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या स्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. शहरातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी फक्त २५१ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु असून उर्वरित १५२२ रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत.
हेही वाचा: जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड: ऍट्रॉसिटी तपासाचा अधिकार वरिष्ठांनाच
शहराबरोबरच जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही बुधवारी साडेतीन हजारांच्या घरात आली आहे. खाली आली आहे. सध्या जिल्ह्यात ३ हजार ५१३ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी ५०४ जणांवर शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू असून, उर्वरित ३ हजार नऊ जण गृहविलगीकरणात आहेत. दिवसभरात नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड हद्दीत एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही.
जिल्ह्यातील दिवसातील नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १८८ रुग्ण आहेत. दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये ७७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ६५ आणि नगरपालिका व कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात प्रत्येकी सात नवीन रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांमध्येही पुणे शहरातील सर्वाधिक ३६० रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील १६५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १४६, नगरपालिका हद्दीतील १९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १० जणांचा कोरोनामुक्तांमध्ये समावेश आहे.
Web Title: Pune District Corona Updates Death Patient
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..