

Pune District Farmers Get Major Crop Insurance Relief As 83000 Farmers Receive Coverage Worth 238 Crore
esakal
-पांडुरंग साठे
कोळवण: पंतप्रधान पीकविमा योजना २०२६ खरीप हंगामात यावर्षी पुणे जिल्ह्यात सुमारे ८३,००० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून या योजनेत शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी सुमारे ५९.७० लाख रुपयांची रक्कम भरली असून त्यांच्या ३९ हजार हेक्टर क्षेत्राला या खरीप हंगामात २३८ कोटी रुपयांचे पीक विमा संरक्षण मिळणार आहे अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे यांनी दिली आहे. पीकविमा काढणे हा हवामानातील अनिश्चितता आणि नैसर्गिक आपत्तींपासून पिकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे.