
Pune Farmers
Sakal
पुणे : जिल्ह्यात खरीप हंगामात पाच कोटी रुपयांच्या उद्दिष्टांपैकी आतापर्यंत ४ हजार २८९ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे ८५ टक्केच पीककर्जाचे वाटप झाले आहे. गेल्या वर्षी उद्दिष्टाच्या ११० टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले होते. तर त्या तुलनेत यंदा कर्जवाटपात सुमारे ९०० कोटींची घट झाली आहे.