
पुणे : जिल्ह्यातील १४ नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींच्या प्रभाग रचनांचे प्रारूप आराखडे जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकार आणि विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आले आहेत. १८ ऑगस्टला ही प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर २१ ऑगस्टपर्यंत हरकती आणि सूचना मागविल्या जाणार आहेत.