Pune News : पुणे जिल्हा ई-चावडी प्रकल्पामध्ये अग्रक्रमावर ठेवावा - डॉ. राजेश देशमुख

पुणे जिल्ह्याने गेल्या दोन वर्षांत नोंदी निकाली काढण्यात आणि सातबारा विसंगती दुरुस्ती व तक्रार प्रकरणांचे प्रमाण कमी करण्यात लक्षणीय कामगिरी केली आहे.
Dr Rajesh Deshmukh
Dr Rajesh DeshmukhSakal
Summary

पुणे जिल्ह्याने गेल्या दोन वर्षांत नोंदी निकाली काढण्यात आणि सातबारा विसंगती दुरुस्ती व तक्रार प्रकरणांचे प्रमाण कमी करण्यात लक्षणीय कामगिरी केली आहे.

पुणे - पुणे जिल्ह्याने गेल्या दोन वर्षांत नोंदी निकाली काढण्यात आणि सातबारा विसंगती दुरुस्ती व तक्रार प्रकरणांचे प्रमाण कमी करण्यात लक्षणीय कामगिरी केली आहे. ई-चावडी प्रकल्पातही पुणे जिल्हा अग्रक्रमावर ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

पुणे जिल्ह्यात ई-चावडी प्रकल्प राबविण्यासाठी आयोजित तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. देशमुख बोलत होते. या वेळी पुणे विभागाचे महसूल उपायुक्त रामचंद्र शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ई-पीक पाहणीमध्ये जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच धर्तीवर शासनाच्या 'महसूल वाढीमध्ये लक्षणीय वाढ करणे' हे उद्दिष्ट असलेल्या ई-चावडी प्रकल्पातही अग्रक्रमावर रहावे.

राज्य समन्वयक नरके यांनी ई-चावडी, ई -हक्क, ई-फेरफार या तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, ई-चावडी व ई-फेरफारमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण केले.

या कार्यशाळेत मंडळ अधिकारी, तलाठी यांनी चर्चा सत्रात भाग घेत आपली मते मांडली. चर्चासत्रात नोंदीचा कालावधी कमी करणे, ई-हक्क व ई-हक्कामध्ये नागरीकांचा सहभाग वाढविणे, तक्रार नोंदीचे प्रमाण कमी करणे यावर सविस्तर चर्चा झाली. याबाबत आवश्यक असल्यास आणखी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

महसूल उपायुक्त रामचंद्र शिंदे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले. प्रशिक्षण कार्यशाळेस महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे उपाध्यक्ष बजरंग मेकाले, पुणे जिल्हा तलाठी संघटनेचे अध्यक्ष सुधीर संलंग, जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.

Dr Rajesh Deshmukh
Walchandnagar Crime : जाचकवस्ती येथे पती-पत्नीची आत्महत्या

काय आहे ई- चावडी -

ई-चावडी हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने अकृषिक कर व शेतसारा भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तलाठी दप्तरातील गाव नमुने १ ते २१ यांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे कामकाज जिल्ह्यामध्ये १ ऑगस्ट २०२२ पासून सुरू करण्यात आले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ९०६ गावांमध्ये ई-चावडी प्रकल्पामध्ये गाव नमुने १ ते २१ चे संगणकीकरणाचे डाटा एन्ट्रीचे कामकाज सुरू करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com