Pune Gram Panchayat Election Live Updates : तिसऱ्या टप्प्यातही भोर आघाडीवर; 60.41% मतदान 

Pune District Gram Panchayat Election 2021 Live Updates
Pune District Gram Panchayat Election 2021 Live Updates

पुणे : जिल्‍ह्यात 649 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींची निवडणूक लढवीत असलेल्या 11 हजार 7 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. 649 ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी साडेसातपासूनच सुरुवात झाली असून साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. हा काळ चार जानेवारीपासून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार करीत असलेल्या उमेदवारांच्या राजकीय भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

आंबेगाव तालुक्यात 25 ग्रामपंचायत निवडणूक मतदान सुरू
आंबेगाव तालुक्यात 25 ग्रामपंचायतींच्या 76 वॉर्डांमध्ये होणाऱ्या निवडणूक मतदानासाठी 92 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे.  मतदान शांततेत सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले मंचर, अवसरी खुर्द, पिंपळगाव तर्फे महाळुंगे, पेठ, माळूंगे पडवळ, गावडेवाडी, भागडी, वळती, शिंगवे, शेवाळवाडी आदि प्रमुख गावांचा समावेश आहे. 54 हजार 45 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 26 हजार 548 महिला व 27 हजार 497 पुरुषांचा समावेश आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झाले. 

भोर  तालुक्यात 60.41% मतदान 
भोर : तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींमधील 770उमेदवारांच्या मतदानाची प्रक्रिया शुक्रवारी (ता.१५) सकाळी साडेसात वाजता सुरळीतपणे सुरु झाली आहे. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत तालुक्यात  39.63 टक्के मतदान झाले. तालुक्यातील 69345 मतदारांपैकी 25926 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये12088 महिला मतदार आणि13838 पुरुष मतदारांचा समावेश आहे. अशी माहिती  तहसीलदार अजित पाटील यांनी दिली. तालुक्याच्या वीसगाव खोऱ्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जात असलेल्या  ग्रामपंचायतींमधील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. खानापूर, भाबवडी व अंबाडे  येथे मतदारांची गर्दी असूनही शांततेत मतदान सुरु होते. या ग्रामपंचायतींमध्ये सकाळी साडेअकरा वाजता 50 टक्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते.

जुन्नर तालुक्यात दुपारी दिडपर्यंत 50 % मतदान
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींच्या 178 प्रभागातील 403 जागांसाठी होणाऱ्या निवडणूक मतदानासाठी 209 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदान शांततेत व सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले ओतूर, आळे, राजुरी, वारुळवाडी, पिंपरि पेंढार, शिरोली बुद्रुक आदि प्रमुख गावांचा समावेश आहे. एक लाख 42 हजार 341 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 69 हजार 676 महिला व 72 हजार 665 पुरुषांचा समावेश आहे.  प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झाले.  दुपारी दीड वाजेपर्यत 60 हजार 681 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यात 29549 महिला व  31,132 पुरुष मतदारांचा समावेश आहे.मतदानाची टकेक्वारी 50.58 इतकी आहे.

मावळात ५९ टक्के मतदान

वडगाव मावळता : मावळ तालुक्यातील49 ग्रामपंचायतींच्या 316 जागांसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत 58.65 टक्के मतदान झाले. 25069 पुरुष व 23327 महिला अशा एकूण 48396 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खांड, सांगवडे, गोवित्री, साई, खांडशी, उकसान, तिकोणा, वारू, येळसे, बऊर,थुगाव, आढले खुर्द या ग्रामपंचायतीत 70

बारामती तालुक्यात एकूण 55.73 टक्के मतदान 
बारामती तालुक्यात दुपारी दीडपर्यंत 49 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानात महिलांचा उत्साह अधिक दिसून आला. दुपारी दीड वाजेपर्यंत बारामती तालुक्यातील 119457 मतदारांपैकी 66574 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून यात 34224 पुरुषांनी तर 32350 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. बारामती तालुक्यात 49 ग्रामपंचायतीतील 199 प्रभागासाठी 199 मतदान केंद्रांच्या माध्यमातून मतदान प्रक्रीया सुरु असून दुपारी दीड पर्यंत पुरुष मतदारांची मतदानाची टक्केवारी 54.96 तर महिला मतदारांची 56.57 इतकी होती तर एकूण 55.73 टक्के मतदान झाले.

पहिल्या टप्या  - सकाळी  7.30 ते 9.30 दरम्यान 
- वेल्हे तालूक्यात 17.48 टक्के मतदान
- भोर तालूक्यात 17.30 टक्के मतदान
- दौंड तालूक्यात 2.18 टक्के मतदान
- बारामती तालूक्यात  15.16 टक्के मतदान
- जुन्नर तालूक्यात  3.60 टक्के मतदान
- आंबेगाव तालुक्यात 13.58 टक्के मतदान

दुसरा टप्पा  सकाळी 7.30 ते11.30 दरम्यान 
- जुन्नर तालुका - 32.64 % मतदान, महिला -17,683 पुरुष - 21,468, एकुण-39,151
- आंबेगाव तालुका - 33.77% मतदान, महिला -8074, पुरुष -10179, एकूण  18253
- भोर तालुका - 39.63 % टक्के मतदान, महिला -12088, पुरुष -13837, एकूण- 25926 
- मावळ तालुक्यात - 38.47 टक्के, महिला -13949, पुरुष-17800, एकूण 31741 



तिसरा टप्पा : दुपारी 1.30 पर्यंतचे मतदान
-बारामती तालुका - 49 % महिला- 32350, पुरुष - 34224  एकूण- 66574 
-जुन्नर तालुका - 50 %  महिला- 29549 , पुरुष  -31,132, एकूण - 60 हजार 681
-भोर तालुका - 60.41% महिला -20137, पुरुष - 19784, एकूण 39921
-मावळ तालुका - 59 %  महिला- 23327, पुरुष- 25069  एकूण - 48396

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com