esakal | पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Rain

पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा २५.७७ टक्के जास्त पावसाची (Rain) नोंद झाली आहे. तर गेल्या दोन महिन्यात सरासरीपेक्षा ३४ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ४८५.५ मिलिमीटर ऐवजी ६५०.८ मिलिमीटर इतका पाऊस पडला होता. त्यामुळे जिल्ह्यात चांगल्या पावसाची नोंद झाल्याचे यातून स्पष्ट होत आहे. (Pune District Increased above Average Rainfall)

जुलै महिन्यात शहरात १९३ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. शहरात अधूनमधून कमी जास्त स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तर रविवारी शहरात १.४ मिलिमीटर तर लोहगाव येथे २ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती. पुढील काही दिवस शहरात पावसाचा जोर कमी राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविले आहे.

रविवारी शहर व परिसरात सकाळपासूनच अंशतः ढगाळ वातावरणाचे सावट कायम होते. तर अधूनमधून ऊन ही पडत होते. मात्र पुढील आठवडाभर शहर आणि परिसरात अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. परंतु घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा ही देण्यात आला आहे.

हेही वाचा: मोडून पडला संसार,आता वेळ पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्याची!

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यातील पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये)

महिना सरासरी पाऊस पडलेला पाऊस तफावत टक्क्यांमध्ये

जून १७६.२ २६१.८ ४८.५८

जुलै ३०९.३ ३८९ २५.७७

loading image
go to top