व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्या, नाहीतर...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

- पुणे जिल्हा साऊंड, लाईट जनरेटर मंडप असोसिएशनचा इशारा 
- असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने साऊंड सिस्टीमवर बंदी घातली नसतानाही पोलिस प्रशासन बंदी करीत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून लाईट मंडप, जनरेटर व्यावसायिक हे व्यवसाय बंद असल्याने कर्ज आणि उपासमारीच्या विळख्यात अडकले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या सार्वजनिक वाहतूक, नाभीक, हॉटेल तसेच अन्य व्यवसाय योग्य ती खबरदारी घेऊन सुरू झाले आहेत. अश्यात प्रशासनाने साऊंड, लाईट मंडपच्या व्यवसायाला देखील योग्य त्या अटी शर्ती घालून पुन्हा सुरू करण्याची परवानगी द्यावी, असे निवेदन पुणे जिल्हा साऊंड, लाईट, जनरेटर मंडप असोसिएशनने जिल्हाधिकारी यांना दिले आहे. तसेच हे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी अध्यक्ष गणेश काळभोर, अनिल पाटील, सिद्धार्थ सुतार, राहुल माने, सुमित गायकवाड, अमोल चांदणे, विकी भोसले, अजय बोज्जा, नाईम शेख, सचिन काटे, तुषार थुल, आकाश बेलेकर आदी उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune District mandap association demand about to start a business