'राष्ट्रवादी'तर्फे निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन; विद्यार्थ्यांसोबत तज्ज्ञांसाठी सुवर्णसंधी!

NCP
NCP

पुणे : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त तालुका आणि जिल्हास्तरीय वैचारिक निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धकांनी 'कोरोना नंतरचे बदल' या विषयावर अभ्यासपूर्ण निबंध लेखन करणे अनिवार्य आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली असल्याचे या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारठकर यांनी सांगितले.

सध्या कोरोनामुळे जागतिक इतिहासातील अत्यंत आव्हानात्मक पर्व सुरु झाले आहे. त्यामुळे सर्वांनाच या नवीन उद्भभवलेल्या परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. या पुढील काळात जगण्यात नेमके काय बदल करावे असतील, त्याला सामोरे कसे जावे? या बाबींवर प्रकाशझोत टाकण्याची गरज आहे. विविध क्षेत्रातील अभ्यासकांनी आपापल्या आवडीच्या क्षेत्राविषयी आपले विचार वैचारिक निबंध स्वरूपात पाठवावेत, असे आवाहनही गारटकर यांनी केले आहे. 

स्पर्धकांनी विशेषतः शिक्षण, वैद्यकीय, वाहन उद्योग, बांधकाम व्यवसाय, बँकिंग किंवा वित्तविषयक, पर्यावरण, सामाजिक जीवन, पोलिस, सुरक्षा, कला व मनोरंजन, क्रीडा, हॉटेल, पर्यटन व्यवसाय, सहकारी संस्था, राजकारण, कापड उद्योग, रिटेल मॅन्युफॅक्चरिंग, सरकारी खात्यांचे कामकाज (उदा. गृह, परिवहन, शेती, अर्थ, महसूल, गृहनिर्माण आदी) विषयावर कमाल १५०० शब्दात निबंध लिहिणे आवश्यक आहे. यासाठी अंतिम तारीख १७ जून आहे.

जिल्हास्तरीय गटांत अनुक्रमे पहिल्या तीन विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी रोख ५१ हजार, ३५ हजार, २५ हजारांची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. शिवाय पाचजणांना प्रत्येकी १० हजार रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत. तालुकास्तरीय गटांत अनुक्रमे २१, १५ आणि १० हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. अन्य पाच जणांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार आहे.

इच्छुकांनी https://bit.ly/NCPnibandhSpardha या लिंकवर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ९७६२१९८५५५ किंवा ९९२२७४०५०५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com