पुणे जिल्ह्यात नव्या तीन महापालिका कराव्या लागणार असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे, मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात एक महापालिका आणि चाकण आणि हिंजवडी भागात या भागांत महापालिका करावी लागणार आहे, असंही अजित पवारांनी यांनी म्हटले आहे. चाकणमधील वाहतूक कोंडी सोडविण्याची दृष्टीने पाहणी दौरा करण्यासाठी अजित पवार आले होते. यावेळी त्यांनी नव्या तीन महापालिकांबाबत वक्तव्य केले.