दिलासादायक बातमी : पुणे जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्यांचा टक्का वाढतोय!

Corona-Pune
Corona-Pune

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून थैमान घातलेल्या कोरोना महामारीने सगळेच त्रस्त आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, तशी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात तसेच जिल्हातील कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने काही प्रमाणात का होईना पण सर्वांना दिलासा मिळाला आहे. 

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 42 हजार 846 झाली आहे. त्यापैकी 26 हजार 623 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, हे प्रमाण 62.14 टक्के आहे.

रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 15 हजार 78 आहे. यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रातील 10 हजार 815, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील 3 हजार 54, पुणे कॅन्टोन्मेंट 84 खडकी विभाग 46 आणि ग्रामीण क्षेत्रातील 995 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाबाधित 1 हजार 145 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मध्ये पुणे महापालिका क्षेत्रातील 887, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील 138, पुणे कॅन्टोन्मेंट 24, खडकी विभागात 29 आणि ग्रामीण क्षेत्रातील 49 रूग्णांचा समावेश आहे. मृत्यूचे प्रमाण 2.67 टक्के इतके आहे. तर, 424 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विभागातील स्थिती :

- कोरोनाबाधित रुग्णांची संख्या : 51 हजार 198 

- बरे झालेले रुग्ण : 31 हजार 390 

- उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या : 18 हजार 196 

- रुग्णांचा मृत्यू : 1612   

- मृत्यूचे प्रमाण : 3.15 टक्के

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com