esakal | बारामती : पोलिसांच्या ताण-तणाव व्यवस्थापनासाठी पोलिस अधीक्षक सरसावले!
sakal

बोलून बातमी शोधा

Baramati_Police

ताणतणाव व्यवस्थापन कसे करावे, काम आणि प्रकृती यांची सांगड कशी घालावी, याबाबत या कार्यशाळेत पोलिसांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

बारामती : पोलिसांच्या ताण-तणाव व्यवस्थापनासाठी पोलिस अधीक्षक सरसावले!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती : शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य नीट राहत नाही, तोवर कार्यक्षमतेने काम करता येत नाही, ही बाब ओळखून पुणे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आता पोलिसांच्या मानसिक स्वास्थ्याकडेही आवर्जून लक्ष देण्यास प्रारंभ केला आहे. 

पोलिस म्हणून नोकरी करताना कमालीच्या ताण-तणावाला सामोरे जावे लागते, पोलिसांना मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य लाभावे, या उद्देशाने बारामतीत नुकतीच पोलिसांसाठी एक कार्यशाळा घेण्यात आली. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बारामतीत ही खास कार्यशाळा आयोजित केली होती. 

दिवाळीनंतर पूर्वीप्रमाणेच कोर्टाचं कामकाज सुरू करा; वकिलांनी दिला कौल​

कोरोना आणि फोबिया मेडिटेशन या विषयावर ही कार्यशाळा घेण्यात झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्यासह पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील, अण्णासाहेब घोलप, पाच सहाय्यक पोलीस निरीक्षक, 68 पुरुष आणि महिला पोलीस कर्मचारी, 'एसआरपीएफ'चे 14 जवान, 16 होमगार्ड उपस्थित होते. 

अमरावती येथील निगेटिव्हिटी अॅण्ड कन्स्लटिंगचे शिवाजी कुचे यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. ताणतणाव व्यवस्थापन कसे करावे, काम आणि प्रकृती यांची सांगड कशी घालावी, याबाबत या कार्यशाळेत पोलिसांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी काय केले पाहिजे, कार्यक्षमता वाढविण्यासाठी कोणत्या पद्धतीने काम करावे, याबाबत त्यांनी माहिती दिली. 

होम क्वारंटाईन झाल्यानंतरही अजित पवारांचा कामाचा धडाका सुरूच

कार्यशाळा पोलिसांसाठी उपयुक्त
अशा कार्यशाळांमुळे पोलिसांच्या मनावरील ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. पोलिस हे देखील माणसेच आहेत, त्यांच्यावरही कमालीचा ताण असतो आणि तो दूर झाल्यास त्यांची कार्यक्षमता वाढू शकते, या उद्देशाने आयोजित केलेले हे शिबिर महत्वाचे होते.
- नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top