esakal | दिवाळीनंतर पूर्वीप्रमाणेच कोर्टाचं कामकाज सुरू करा; वकिलांनी दिला कौल
sakal

बोलून बातमी शोधा

Law&Order

दहा वर्षांपुढील प्रॅक्‍टिस असणा-या अनेक वकिलांचे म्हणणे आहे की, पुढील महिन्यात दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे दिवाळी झाल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेत नियमित कामकाज सुरू करावे.

दिवाळीनंतर पूर्वीप्रमाणेच कोर्टाचं कामकाज सुरू करा; वकिलांनी दिला कौल

sakal_logo
By
सनील गाडेकर

पुणे : दिवाळी झाल्यानंतरच न्यायालयाचे कामकाज नियमित सुरू करावे, असा कौल शहरातील अनेक वकिलांनी दिला आहे. तर तरुण वकिलांचा आग्रह हा लगेच पूर्ण क्षमतेने कामकाज सुरू करण्याचा आहे. न्यायालयीन कामकाज नियमितपणे सुरू करावे का? ते किती शिफ्टमध्ये असावे? कामकाजाची पद्धती नेमकी कशी असावी? याबाबत उच्च न्यायालयाने पाठवलेल्या पत्रानुसार पुणे बार असोसिएशनकडून (पीबीए) वकिलांकडे विचारणा करण्यात आली आहे. त्यावर वकिलांनी हा प्रतिसाद दिला आहे.

Video : पाच वर्षाच्या चिमुकलीने केले दोन मिनिटात भीमानदीचे पात्र पार

अनलॉकनंतर शहरातील न्यायालयांचे कामकाज एका शिफ्टमध्ये सुरू करण्यात आले आहे. मात्र, त्यात केवळ तत्काळ आणि महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी होत आहे. इतर कामकाज रेंगाळल्याने पक्षकारांना न्याय मिळण्यास उशीर होत आहे. तर वकिलांना फी स्वरूपात मिळणाऱ्या उत्पन्नावर देखील टाच आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नियमित कामकाज सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. या सर्वांचा विचार करत नियमित कामकाज सुरू करण्याबाबत वकिलांच्या काय भावना आहेत? याचा अंदाज उच्च न्यायालयाकडून घेण्यात येत आहे. उच्च न्यायालयाने राज्यातील प्रत्येक प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना पत्र पाठवून वकील संघटनांच्या माध्यमातून वकिलांच्या भावना समजावून घेण्याचे आवाहन केले होते. नियमित सुनावणी सुरू झाल्यास दावे प्रलंबित असलेल्या हजारो पक्षकारांना दिलासा मिळणार आहे. तसेच जिल्ह्यात प्रॅक्‍टिस करणाऱ्या सुमारे 12 हजार वकिलांना या निर्णयाचा फायदा होईल.

मृत्यू दाखल्याचे काम अन्‌ दोन महिने थांब; कसबा पेठ कार्यालयात सावळा-गोंधळ​

तर आर्थिक अडचण दूर होईल :
दहा वर्षांपुढील प्रॅक्‍टिस असणाऱ्या अनेक वकिलांचे म्हणणे आहे की, पुढील महिन्यात दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे दिवाळी झाल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेत नियमित कामकाज सुरू करावे. मात्र लॉकडाऊनमुळे तरुण वकिलांची प्रॅक्‍टिस पूर्णतः थांबली आहे. आर्थिक अडचणीत सापडल्याने तरुण वकील लगेच कामकाज सुरू करण्याची मागणी करीत आहेत.

यापूर्वी देखील मागवले होते अभिप्राय :
न्यायालयाचे कामकाज दोन शिफ्टमध्ये सुरू करावे का? या मुद्यावर यापूर्वी देखील वकिलांचे अभिप्राय मागविण्यात आले होते. तेव्हा अनेकांनी एकच शिफ्टमध्ये कामाला पसंती दिली होती. मात्र आता पूर्ण वेळ कामकाज सुरू करण्याची मागणी करणारे वकील वाढले आहेत.

होम क्वारंटाईन झाल्यानंतरही अजित पवारांचा कामाचा धडाका सुरूच

सध्या तरुण वकील आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे या सर्वांचे म्हणणे आहे की, नियमित कामकाज सुरू करा. तर बाकी वकिलांना वाटते की, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता आहे. पुढील महिन्यात सुट्टीचा विचार करता दिवाळीनंतर न्यायालये नियमित सुरू करावीत. सर्वांचे म्हणणे आम्ही प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना पोचवले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती आणि तेथील वकिलांचे म्हणणे यानुसार उच्च न्यायालय योग्य तो निर्णय घेईल.
- ऍड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top