पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा
Published on

प्रभात रोड ः सिंबायोसिस स्पोर्ट्‌स सेंटरच्या टेबल टेनिस हॉलमध्ये सुरू असलेल्या पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत आहाना गोडबोले सुरेख फटका मारताना.


गोडबोले, इंगवलेचे मानांकितावर विजय
पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

पुणे, ता. २७ ः सिंबायोसिस स्पोर्ट्‌स सेंटर यांच्या वतीने आयोजित चौथ्या पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत आहाना गोडबोले, तनय इंगवलेने मानांकित खेळाडूंवर विजय मिळविताना आपली आगेकूच कायम राखली आहे.
पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने प्रभात रोड येथील सिंबायोसिस स्पोर्ट्‌स सेंटरच्या टेबल टेनिस हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत पंधरा वर्षांखालील मुलांच्या गटात बिगर मानांकित तनय इंगवलेने दुसऱ्या मानांकित पुष्कर चक्रदेवचा ११-७, ११-५, १०-१२, ११-८ असा, अव्वल मानांकित आर्यन वानखेडेने साहिल भोरकरचा ११-४, ११-७, ११-३ असा, आणि चौथ्या मानांकित नभ पांचोलियाने मिथिल ठक्करचा ११-६, ११-८, ११-६ असा पराभव केला होता.
मुलींच्या गटात सहाव्या मानांकित आहाना गोडबोलेने तिसऱ्या मानांकित शरण्या पटवर्धनचा ११-५, १२-१०, ६-११, ११-७ असा, अव्वल मानांकित दिया शिंदेने डायना पटेलचा ११-६, ११-६, ११-६ असा तर चौथ्या मानांकित अनन्या पाटीलने पाचव्या मानांकित स्पृहा गुजरचा ११-३, ११-५, ८-११, ९-११, ११-७ असा आणि दुसऱ्या मानांकित नीरजा देशमुखने श्रेया कोठारीचा ११-५, ४-११, ११-३, ११-८ असा पराभव केला होता.
निकाल :
पंधरा वर्षांखालील मुले : उप उपांत्यपूर्व फेरी : एल्विस टॉम वि.वि. अंगद भार्गवे १२-१०, ११-९, ११-५; वरदान कोलते वि.वि. साद वकील ११-७, ११-९, ११-५; ऋग्वेद दांडेकर वि.वि. सर्वेश जोशी ८-११, ६-११, १२-१०, ११-८, ११-६; नीरज नांदेडे वि.वि. आदम रामपूरवाला ११-८, १५-१३, ११-७; वरद माळवदकर वि.वि. ओंकार अभ्यंकर ९-११, ११-८, ११-६, ११-६; तनय इंगवले वि.वि. पुष्कर चक्रदेव ११-७, ११-५, १०-१२, ११-८.
---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com