Pune District Achieves Water Richness
Sakal
पुणे
Pune News : पुणे जिल्ह्यातील १६ धरणे १०० टक्के भरली; खडकवासला, माणिकडोहचा पाणीसाठा सर्वात कमी
Pune District Achieves Water Richness : पुणे जिल्ह्यात गेल्या सात महिन्यांपासून (मे ते नोव्हेंबर) सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भीमा खोऱ्यातील २७ धरणांपैकी १६ धरणे १०० टक्के भरली असून, केवळ खडकवासला आणि माणिकडोह धरणांत पाणीसाठा अनुक्रमे ६४.७५% आणि ८४.५९% इतका कमी आहे.
नरेंद्र साठे
पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुणे जिल्हा पुन्हा एकदा निसर्गसंपन्न आणि जलसमृद्ध झालेला आहे. धरण परिसरातून ओसंडून वाहणारे पाणी, नद्या-नाल्यांमधील वाढलेला प्रवाह आणि हिरवाईची भरभराट यामुळे जिल्ह्यात पावसाळ्याची खरी मजा अनुभवायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे सोळा धरणे काठोकाठ भरल्याने जिल्हा जलसंपत्तीने समृद्ध झाला असून, पावसाचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत खूप जास्त आहे.

